Munawar Faruqui Apologises: कोकणी लोकांवर केलेल्या वादग्रस्त टिपण्णीबाबत मुनव्वर फारुकीने मागितली जाहीर माफी; शेअर केला व्हिडिओ (Watch)

मुनावर फारुकीने काही काळापूर्वी तळोजा येथे कॉमेडी शो दरम्यान कोकणी लोकांबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल सोमवारी माफी मागितली. याबाबत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्ट केले की, त्याच्या टिप्पण्यांद्वारे कोणालाही दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता,

Munawar Faruqui (संग्रहित संपादित प्रतिमा)

Munawar Faruqui Apologises: बिग बॉस हिंदी सीझन 17 चा विजेता आणि स्टँडअप कोमेडियन मुनव्वर फारुकी याआधी अनेकवेळा वडाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता पुन्हा एकदा मुनव्वरने नव्या वादाला तोंड फोंडले आहे. यावेळी मुनव्वर कोकणी माणसाचा अपमान करून अडचणीत आला. मुनव्वरने आपल्या स्टॅंडअप कॉमेडीच्या कार्यक्रमात कोकणी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यानंतर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. अनेक राजकारणी लोकांनी यावव्र आक्षेप घेतल्यानंतर अखेर मुनव्वरने जाहीर माफी मागितली आहे.

त्याने सांगितले की, त्याच्या टिप्पण्या प्रेक्षकांशी संवादाचा भाग आहेत. यापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुनव्वरला पाकिस्तानात पाठवण्याची धमकी दिली होती. ‘तुझ्यासारखा हिरवा साप पाकिस्तानात पाठवायला वेळ लागणार नाही,’ अशा शब्दात राणे यांनी मुनावर फारुकीला धमकावले होते. मनसेकडूनही मुनव्वरच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. (हेही वाचा: 'Goodbye, I'm Done'! कॉमेडीअन Munawar Faruqui चे 2 महिन्यात 12 शो रद्द; इमोशनल पोस्ट लिहित व्यक्त केले दुःख)

पहा पोस्ट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement