Mumbai Weather Forecast: मुंबईकरांना दिलासा! जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात मान्सूनच्या पावसाला होणार सुरुवात- Reports
मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. अहवालानुसार, पूर्वीच्या अपेक्षेप्रमाणे, पहिला आठवडा पावसासाठी पूर्णपणे अनुकूल दिसत आहे.
Mumbai Weather Forecast: गेल्या आठवड्यापासून कोकणातील तापमानाचा प्रभाव या आठवड्यातही कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना बुधवारपर्यंत उष्ण आणि दमट हवामानासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला होता. प्रादेशिक हवामान विभागाने इशारा अपडेट केला असून, पुढील दोन दिवस उष्ण हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. बुधवार ते शुक्रवार धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. अहवालानुसार, पूर्वीच्या अपेक्षेप्रमाणे, पहिला आठवडा पावसासाठी पूर्णपणे अनुकूल दिसत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व सरी कोसळल्यानंतर मुंबईत जूनच्या मध्यापासून जोरदार पावसाची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Weather Forecast for Monsoon: उष्णतेच्या लाटेवर मान्सूनचे पाणी, तापमान घटणार, जाणून घ्या हवामान अंदाज)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)