Mumbai Water Cut: येत्या 4 ते 5 जानेवारी दरम्यान मुंबईमधील मलबार हिल, दादर, लोअर परळ, कुर्ला, पवईसह अनेक भागात पाणीकपात
बाधित क्षेत्रांमध्ये मलबार हिल जलाशय आणि आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवले जाणारे अ वॉर्डमधील सर्व झोन समाविष्ट आहेत,
Mumbai Water Cut: देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबईमधील काही परिसरातील पाणीपुरवठा तात्पुरता थांबवला जाणार असल्याची बातमी आली होती. आता माहिती मिळत आहे की, मुंबईमधील पाणीपुरवठ्यावरही पैनाम होणार आहे. पवई व्हेंचरीजवळ अप्पर वैतरणा आणि वैतरणा मुख्य दरम्यान क्रॉस कनेक्शनवर गळती आढळून आली आहे. नागरी कर्मचार्यांनी ही गळती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज ते शक्य झाले नाही. आता वैतरणा जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरूवार 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते शुक्रवार 5 जानेवारी 2024 सकाळी 10, म्हणजे 24 तासांसाठी घेण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
बाधित क्षेत्रांमध्ये मलबार हिल जलाशय आणि आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवले जाणारे अ वॉर्डमधील सर्व झोन समाविष्ट आहेत, जिथे पाणीपुरवठ्यात 10% कपात होईल. तसेच अप्पर तुंगा, लोअर तुंगा, रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, साकी विहार रोड, साकीनाका, चांदिवली फार्म रोड, नाहर अमृत शक्ती, आयआरबी रोड, संघर्ष नगर खैराणी रोड, मोहिली पाइपलाइन रोड यांसारख्या काही भागांना 4 ते 5 जानेवारी दरम्यान पाणीपुरवठा होणार नाही. या वॉर्डातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा; No Water Supply In Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये 5 आणि 6 जानेवारीस पाणीपुरवठा खंडीत)
वैतरणा जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरूवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात आले आहे. सबब ए, सी, डी, ई, जी उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व आणि एच पश्चिम या विभागातील pic.twitter.com/SiOhI0eZ1N
— Ward HW BMC (@mybmcWardHW) January 3, 2024
Water supply to many parts of Mumbai namely Malabar Hill, Dadar, Lower Parel, Kurla, Powai will be affected between January 4-5. (Contd) pic.twitter.com/l0jkNdhrEg
— Richa Pinto (@richapintoi) January 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2024 10:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

