Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! शहरातील काही ठिकाणी 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी 30 तासांसाठी होणार पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित भाग
पाणी पुरवठा खंडित होण्यापूर्वी रहिवाशांना पुरेसे पाणी अगोदरच साठवून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच लोकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे.
पुढील आठवड्यामध्ये मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शुक्रवारी जाहीर केले की, येत्या 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये 30 तासांसाठी तात्पुरती पाणी कपात केली जाईल. या कालावधीत बीएमसीच्या एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर वॉर्डांसह काही भाग क्षेत्र प्रभावित होतील. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. ही पाणी कपात बुधवार, 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, पवई अँकर ब्लॉक आणि मरोशी वॉटर टनेल दरम्यान नवीन 2400 मिमी व्यासाची पाण्याची पाइपलाइन कामामुळे पाणीकपात करण्यात येणार आहे. विद्यमान 1800 मिमी तानासा पूर्व आणि पश्चिम पाइपलाइन तात्पुरते खंडित करून नवीन पाइपलाइन जोडण्याचे काम केले जाणार आहे.
पाणी पुरवठा खंडित होण्यापूर्वी रहिवाशांना पुरेसे पाणी अगोदरच साठवून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच लोकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, गढूळ पाण्याचा तात्पुरता पुरवठा होऊ शकतो, त्यामुळे सुरक्षिततेसाठी ते पाणी वापरण्यापूर्वी फिल्टर करावे आणि उकळून घ्यावे अशी शिफारस केली जात आहे. (हेही वाचा: Guillain-Barré Syndrome In Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला; चाचणीत शहरातील 'या' 7 ठिकाणाचे पाणी आढळले बॅक्टेरियामुळे दूषित)
Mumbai Water Cut:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)