Mumbai: महापालिकेविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यांवर लिहिले ‘बीएमसी विकास’ (Watch Video)
तरुण काँग्रेस सदस्यांच्या या नव्या निषेधामध्ये, शहरातील विविध ठिकाणी खड्डे चिन्हांकित करणे आणि त्यावर ‘बीएमसी विकास’ असे लिहून बीएमसीने केलेल्या विकासाचे श्रेय देणे समाविष्ट आहे.
पावसाळ्याचे आगमन होताच मुंबईकरांना पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बीएमसी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात अपयशी ठरली आहे. आता खड्डेमुक्त रस्ते देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अकार्यक्षमतेचा आरोप करत, मुंबई युवक काँग्रेसने तातडीने खड्डे बुजविण्याबाबत मोहीम सुरू केली आहे. तरूण काँग्रेसचे सदस्य शहरभर खड्डे शोधात आहेत, आणि महापालिकेच्या कथित अकार्यक्षमतेवर प्रकाश टाकण्यासाठी त्यावर 'बीएमसी विकास' लिहित आहेत.
तरुण काँग्रेस सदस्यांच्या या नव्या निषेधामध्ये, शहरातील विविध ठिकाणी खड्डे चिन्हांकित करणे आणि त्यावर ‘बीएमसी विकास’ असे लिहून बीएमसीने केलेल्या विकासाचे श्रेय देणे समाविष्ट आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोपही आंदोलक सरकारवर करत आहेत. मुंबई युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुफियान हैदर यांनी सुरू केलेला हा उपक्रम अंधेरीच्या विविध भागांतून सुरू करण्यात आला आहे. या आंदोलनानंतर युवक काँग्रेसने चिन्हांकित केलेले खड्डे बुजवण्यास बीएमसीने सुरुवात केली आहे. (हेही वाचा: Boy Drowns In Rainwater Filled Pit: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; Uttan येथील धक्कादायक घटना)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)