Mumbai: शिवाजी नगर येथे भूमिगत गटार साफसफाईचे काम करताना मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू
हे दोघे एका मॅनहोलमध्ये पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोवंडीतील नवीन बस डेपोजवळील 90 फूट रोड, रोड क्रमांक 10 वर ही घटना घडली.
आज भुयारी गटार सफाईचे काम करताना दोन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शिवाजी नगर येथे घडली. हे दोघे एका मॅनहोलमध्ये पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोवंडीतील नवीन बस डेपोजवळील 90 फूट रोड, रोड क्रमांक 10 वर ही घटना घडली. राजावाडी रुग्णालयातील डॉ. प्रवीण बाबर यांनी या घटनेची माहिती दिली. रामकृष्ण (वय 25) आणि सुधीर दास (वय 30) अशी मृतांची नावे आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा: Mumbai: मुंबईच्या इन्फिनिटी मॉलमधील गेम झोनमध्ये मोठा अपघात; ट्रॅम्पोलिन स्प्रिंग तुटल्यामुळे तरुणाचा पाय फ्रॅक्चर, FIR दाखल)
Mumbai | Two persons died after falling inside a manhole during underground drain cleaning work at Shivaji Nagar today
— ANI (@ANI) June 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2023 10:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

