Mumbai Traffic Diversions at Marine Drive Updates: टीम इंडिया च्या जंगी Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल; पहा बंद रस्ते, पर्यायी मार्ग
Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
आज मुंबई मध्ये एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुकीच्या अनुषंगाने दक्षिण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही मार्ग बंद केले असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओपन डेक बसमधून टीम इंडिया रवाना होणार आहे. दिल्ली नंतर आता T20 World Cup 2024 Champions च्या स्वागताला मुंबई सज्ज; Victory Parade च्या ओपन डेक बसची पहा झलक (Watch Video).
मरीन ड्राईव्ह भागातील मोठे बदल
दि.०४/०७/२०२४ रोजी मरीन ड्राईव्ह येथे "टी-२० विश्वचषक २०२४ विजेते" भारतीय क्रिकेट संघाची शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे. त्याकरीता सदर ठिकाणी लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने वाहतूकीची कोंडी टाळण्याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत. pic.twitter.com/iGBuWEdhOb
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 4, 2024
विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या मुंबईत मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान शोभायात्रेचं आयोजन.
क्रिकेट संघाच्या शोभायात्रेमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याची पोलीसांची सूचना. #T20WorldCup2024 #TeamIndia #Shobhayatra pic.twitter.com/xg25cWOWay
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2024 11:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

