Mumbai: अंधेरीमध्ये जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब कारवर पडला, कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)

अंधेरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब दुपारी 3.20 च्या सुमारास कारवर पडला.

Slab of Jogeshwari-Gundavali Flyover Falls On Car

Slab of Flyover Falls on Car: पश्चिम मुंबईतील अंधेरी परिसरात गुरुवारी दुपारी एका चालत्या कारवर उड्डाणपुलाचा स्लॅब पडल्याची धक्कादायक घटना घडली. यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र कारचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अंधेरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब दुपारी 3.20 च्या सुमारास कारवर पडला. स्लॅब कारच्या बोनेटवर पडला आणि यामुळे गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक वॉर्ड ऑफिसचे कर्मचारी मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. (हेही वाचा: Paalghar Absconding Accused Arrested: पालघरमध्ये घरे देण्याच्या नावाखाली १.१५ कोटींची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अटक)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)