Mumbai Shocker: वादानंतर रागाच्या भरात 30 वर्षीय तरूणीची बॉयफ्रेंड कडून रिक्षात गळा चिरून हत्या; स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न अयशस्वी
दीपक विरूद्ध खूनाच्या कलमाखाली (कलम 302) कारवाई सुरू करण्यात आली आहे. साकिनाका पोलिस स्टेशन मध्ये हे प्रकरण सुरू असून त्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
मुंबई (Mumbai) मध्ये पुन्हा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. साकीनाका (Saki Naka) भागात खैराणी मार्गावर 30 वर्षीय तरूणीचा तिच्याच बॉयफ्रेंड ने चालत्या रिक्षामध्ये गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. पंचशीला अशोक जामदार असं तिचं नाव असून ती चांदिवलीच्या संघर्ष नगर येथील रहिवासी होती. रिक्षा प्रवासामध्ये पंचशीला आणि आरोपी मध्ये वाद झाला. या वादातून त्याने चक्क तिच्या गळ्यावर चाकू फिरवला. आरोपीचं नाव दीपक बोरसे आहे.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, रिक्षामध्ये गर्लफ्रेंडचा खून केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतू दीपकला केवळ किरकोळ जखमा झाल्या. पोलिसांना दीपकच्या मुसक्या आवळण्यात यश आलं. सध्या आरोपी दीपक पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे.
दीपक विरूद्ध खूनाच्या कलमाखाली (कलम 302) कारवाई सुरू करण्यात आली आहे. साकिनाका पोलिस स्टेशन मध्ये हे प्रकरण सुरू असून त्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. नक्की वाचा: Nagpur Shocker: नागपूर येथील बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह कारमध्ये सापडले, धक्कादायक कारणामुळे मृत्यू; घ्या जाणून .
महाराष्ट्रात काल पुण्यामध्येही एका वनविभाग अधिकारीचा मृतदेह राजगडाजवळ आढळला आहे. 26 वर्षीय या तरूणीने नुकतेच एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलं होतं. दर्शना मित्रासोबत ट्रेकिंगला गेली असता तिचा घातपात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दर्शनाचा मित्र सिंहगड उतरताना दिसत आहे पण त्याच्यासोबत दर्शना नसल्याने आता त्याच्यावर संशय बळावला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)