Mumbai School Holiday: मुंबईमध्ये उद्याही मुसळधार पावसाचा इशारा; रेड अलर्ट जारी, 26 सप्टेंबर रोजी BMC व TMC क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबई तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
Mumbai School Holiday: भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (२६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, मुंबई तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.मुंबईत आज दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकल सेवेवर झाल्याचे दिसले. (हेही वाचा: Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा विमानसेवेवर परिणाम; दोन उड्डाणे वळवली, SpiceJet ने दिला विलंबाचा इशारा)
26 सप्टेंबर रोजी बीएमसी आणि टीएमसी क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर-
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) September 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)