Mumbai Road Accident: मुंबईच्या सायन परिसरात भरधाव कारने दिली वृद्ध महिलेला धडक; पिडीतेचा उपचारादरम्यान मृत्यू (VIDEO)

अपघातावेळचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक कार भरधाव वेगाने येऊन महिलेला जोरात धडकते व त्यामुळे महिला बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडते.

Mumbai Road Accident

मुंबईतील सायन परिसरात भरधाव कारने एका वृद्ध महिलेला धडक दिली आहे. एका कार चालकाने या महिलेला मागून इतकी जोरदार धडक दिली की ती जखमी होऊन रस्त्यावर खाली पडली. त्यानंतर लोकांनी महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातानंतर एका दिवसात महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातावेळचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक कार भरधाव वेगाने येऊन महिलेला जोरात धडकते व त्यामुळे महिला बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडते. जेव्हा ड्रायव्हरकडे विचारणा केली गेली तेव्हा त्याने महिला आधीच बेशुद्ध झाल्याचे सांगितले होते. मात्र या घटनेच्या व्हिडिओद्वारे सत्य समोर आले आहे. (हेही वाचा: Mumbai: मुंबईतील चांदिवलीत भरधाव दुचाकी कारला धडकल्याने दोन जखमी; 3 दिवसात दुसरी घटना, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement