Mumbai Rains: मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी (Watch Video)
हवामान खात्याने (IMD) मुंबई, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोलापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
Mumbai Rains: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने (IMD) मुंबई, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोलापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशात आज संध्याकाळी मुंबईमध्ये पावसाच्या सारी कोसळल्या. सोशल मिडियावर अनेक युजर्सनी मुंबईमधील अवकाळी पावसाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. सोमवारपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने कोकणात अवकाळी पाऊस पडत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात सोमवारी पावसाने दणका दिला. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पारा वाढल्याने थंडी कमी झाली आहे. धुके आणि ढगांच्या आच्छादनामुळे मुंबई शहरात दमटपणा जाणवत आहे. (हेही वाचा: Thane Water Supply News: रस्त्याचे काँक्रिटीकरण! ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरात पुढचे 24 तास पाणीपुरवठा बंद)