Mumbai Rains: मुंबई, ठाणे शहराला आज ऑरेंज अलर्ट; सकाळी 10 वाजेपर्यंत काही ठिकाणी अतिमुसळधारेचा IMD चा अंदाज
मुंबई, ठाण्यात आज सकाळी जोरदार वार्यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची देखील शक्यता आहे.
मुंबई शहरात मागील काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा बरसण्यास सुरूवात झाली आहे. रात्रीपासून वाढलेल्या पावसाचा जोर पाहता आज (9 ऑगस्ट) मुंबई, ठाणे शहराला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत काही ठिकाणी अतिमुसळधारेचा IMD चा अंदाज देखील आहे. यावेळी वार्याचा वेग 40-50 kmph असण्याचा अंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)