Mumbai: राहुल गांधी यांच्या 28 डिसेंबरच्या रॅलीसाठी महापालिकेचा नकार, मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थिती केले सवाल

मुंबईत येत्या 28 डिसेंबरला काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्या दरम्यान, राहुल गांधी यांची रॅली काढली जाणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. परंतु महापालिकेने त्यासाठी विरोध दर्शवला आहे.

Mumbai Congress chief Bhai Jagtap (Photo Credits-ANI)

मुंबईत येत्या 28 डिसेंबरला काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्या दरम्यान, राहुल गांधी यांची रॅली काढली जाणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. परंतु महापालिकेने त्यासाठी विरोध दर्शवला आहे. याच संदर्भात काँग्रेसने आता बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आता उद्या सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे.

दुसऱ्या बाजूला मुंबईतील काँग्रेसचे प्रमुख भाई जगताप यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर महापालिकेच्या विरोधावर प्रश्न उपस्थितीत केले आहेत. भाई जगताप यांनी असे म्हटले की, आम्हाला कळत नाही का परवानगी दिली जात नाही आहे? जर त्यांना कोविडची काळजी वाटत असेल तर त्या संदर्भातील गाइडलाइन्सनुसार पत्र सुद्धा दिले आहे. जास्त वेळ शिल्लक नसल्यामुळे, आम्हाला परवानगीसाठी न्यायालयात जावे लागले असे ही भाई जगताप यांनी म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now