Mumbai: विना हेल्मेट गाडीवरून प्रवास करताना दिसल्या महिला पोलीस; वाहतूक विभागाने ठोठावला प्रत्येकी 500 रुपयांचा दंड
दादरजवळील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर या दोन पोलीस महिला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना दिसल्या होत्या. राहुल बर्मन नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हे छायाचित्र अपलोड केले होते.
मुंबईत दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे हा गुन्हा आहे. या नियमाचे वारंवार उल्लंघन केल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. वेळोवेळी पोलीस हेल्मेट न घालता गाडी चालवणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करत असतात. आता बुधवारी मुंबई वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घातल्याबद्दल दोन महिला पोलिसांना दंड ठोठावला. चुनाभट्टी पोलीस स्टेशन व वाहतूक विभागाच्या वतीने विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या महिला पोलिसांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही महिला पोलीस कर्मचार्यांकडून प्रत्येकी ₹ 500/- ची रक्कम वसूल करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलीस हँडलने ट्विटरद्वारे माहिती दिली.
दादरजवळील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर या दोन पोलीस महिला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना दिसल्या होत्या. राहुल बर्मन नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हे छायाचित्र अपलोड केले होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. (हेही वाचा: IIT Bombay Student Darshan Solanki Suicide Case: मुंबई पोलिस SIT टीम कडून आरोपी Arman Khatri च्या खोलीतून जप्त केले कटर!)
Suitable action has been taken on the policewomen riding the bike without helmet at Chunabhatti Police Station & Traffic Department for violating the law. Compounding amount of Rs 500/- each has been recovered from both the police personel https://t.co/C9JSF9uBne pic.twitter.com/ibkbc3P2Dy
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) April 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2023 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

