Antilia: संशयास्पद व्यक्तींनी विचारला मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाचा पत्ता, पोलीस सतर्क

एका टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे की, दोन संशयास्पद व्यक्तींनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थान अँटीलीयाचा पत्ता विचारला आहे. एका टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. त्यांनी तातडीने अँटिलिया बाहेर सुरक्षा वाढवली; सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. तसेच डीसीपी दर्जाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)