Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं; पहा Mumbai Police चा खुलासा
Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं असल्याचं मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडीया पोस्ट द्वारा म्हटलं आहे.
Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं असल्याचं मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडीया पोस्ट द्वारा म्हटलं आहे. ' वायरल व्हिडिओ तील लोकांच्या प्रतिभेचा आदर करून, आम्ही खाकीची शिस्त आणि प्रतिष्ठा जपणारे ट्रेंड निर्माण करण्यास प्राधान्य देतो. आम्ही सर्वांना जबाबदारीने माहिती शेअर करण्याची विनंती करतो.' असा खुलासा त्यांनी केला आहे. ‘Aura Farming’ हा शब्द सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, जो सहज शांतता दाखवण्याच्या आणि स्वतःचा वैयक्तिक करिष्मा किंवा 'ऑरा' विकसित करण्याच्या पद्धतीचा संदर्भ देतो. इंडोनेशियातील कुआंतान सिंगिंगी रीजन्सी येथील 11 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या रेयान अर्कान दिखाच्या व्हायरल व्हिडिओने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबई पोलिसांची पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)