Mumbai: विमानाच्या बाथरुममध्ये ओढली बिडी; प्रवाशाला अटक, सहार पोलिसांकडून गुन्हा दाखल

या व्यक्तीने विमानाच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान केल्याचा आरोप आहे. ही व्यक्ती दिल्लीवरून मुंबईला प्रवास करत होता त्यावेळी ही घटना घडली.

Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

एका 42 वर्षीय प्रवाशाला मुंबईत सहार पोलिसांनी विमानात 'बिडी' पेटवल्याबद्दल अटक केलीआहे. मोहम्मद फकरुद्दीन मोहम्मद अमरुद्दीन असे या प्रवाशाचे नाव आहे. आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आयपीसीच्या 336 अन्वये आणि विमान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली. या व्यक्तीने विमानाच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान केल्याचा आरोप आहे. ही व्यक्ती दिल्लीवरून मुंबईला प्रवास करत होता त्यावेळी ही घटना घडली. त्याच्याकडे सौदी अरेबियाला जाणारे कनेक्टिंग फ्लाइट होते, पण मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्याला इंडिगोच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. (हेही वाचा: Three Dogs Died In Powai: विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत तीन श्वानांचा मृत्यू; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now