Onion Prices In Mumbai: मुंबईमध्ये कांदा कडाडला, विद्यमान दर प्रतिकिलो 80 रुपये; आगामी काळात 150 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
मुंबई मार्केटमध्ये कांदा सध्या 80 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. हाच दर आगामी काळात 150 रुपये किलोवर पोहोचला जाण्याची शक्यता आहे.
टोमॅटो दराने उसळी मारून आता कुठे स्थिरता गाठली असतानाच आता कांदा दर गगनासा भीडण्याची शक्यता आहे. मुंबई मार्केटमध्ये कांदा सध्या 80 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. हाच दर आगामी काळात 150 रुपये किलोवर पोहोचला जाण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एनायने एका भाजीविक्रेत्याची प्रतिक्रिया घेतली. ज्यात त्याने सरकारला कांद्याचे दर कमी करण्यासाठी अवाहन केले आहे. आपण हा व्हिडिओ येथे पाहू शकता. (हेही वाचा, Onion Price Hike: सणासुदीच्या काळात कांदा झाला तिखट; 60 रुपयांवर पोहोचले दर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)