Mumbai: चोर असल्याच्या संशयावरून जमावाने केली मारहाण; व्यक्तीचा मृत्यू, बोरिवलीमधील धक्कादायक घटना

प्रवीण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांना अहवालाची प्रतीक्षा आहे. लहाने यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

मुंबईतील बोरिवली पूर्व भागात गुरुवारी पहाटे चोर समजून जमावाने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. प्रवीण लहाने असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या एका पथकाने प्रवीण यांना जमावापासून वाचवले आणि त्यांना प्रथम कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात आणि नंतर जवळच्या रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर प्रवीण यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर प्रवीण पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात नेले असता तिथे त्यांचा मृत्यू झाला. प्रवीण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांना अहवालाची प्रतीक्षा आहे. लहाने यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now