Mumbai Metro 3: मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासा! जुलैपासून सुरु होणार मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा
हा भूमिगत कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरवर 27 स्थानके असून, त्यातील 26 भूमिगत आणि एक जमिनीवर आहे.
Mumbai Metro 3: मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) मेट्रो 3, एक्वा लाइनचा पहिला टप्पा सुरू करण्याची तयारी करत आहे. अहवालानुसार, मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा जुलैपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यात आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान मेट्रो धावणार आहे. सध्या आरे डेपोचेही 99.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे डेपो 30 हेक्टरमध्ये पसरलेला आहे, त्यापैकी स्टेशन आणि डेपोमध्ये 25 हेक्टर जागा व्यापलेली आहे आणि उर्वरित 5 हेक्टर इतर वापरासाठी आहे. जिथे मेट्रोच्या देखभाल, संचालन, प्रशासन आणि प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे ट्रेन ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी बॅकअप ऑपरेशन आणि कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. मेट्रो 3 ही लाईन कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी 33.5-किमी लांबीची आहे. हा भूमिगत कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरवर 27 स्थानके असून, त्यातील 26 भूमिगत आणि एक जमिनीवर आहे. सध्या, पहिल्या टप्प्यासाठी चाचण्या सुरू आहेत. फेज 1 च्या कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट जवळजवळ तयार, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Sensual Dance Moves In Mumbai Local: मुंबई लोकल, CSMT स्थानकात गाण्यावर थिरकत अश्लिल हावभाव करणार्या मुलीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाने घेतली दखल)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)