Mumbai Mega Block On June 8: मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, 8 जून रोजीसाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक जाहीर, जाणून घ्या सविस्तर

शहरातील पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने 8 जून रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

Mumbai Local (Photo Credit: Wikimedia Commons)

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवार 8 जून 2025 रोजी शहरातील पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने 8 जून रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉक दरम्यान, ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामे केली जातील. यावेळी सर्व स्लो मार्गावरील गाड्या फास्ट मार्गांवर धावतील. काही अप/डाउन उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर येथे शॉर्ट-टर्मिनेटेड/रिव्हर्स केलेल्या आहेत.

हार्बर लाईनवर सकाळी 10.33 ते दुपारी 3.48 पर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर लाईनच्या बाबतीत, सकाळी 11.02 ते दुपारी 3.35 पर्यंत पनवेलहून ठाण्याला जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत ठाण्याहून पनवेलला जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: पुढील 3 दिवस मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी पाऊस आणि वादळाचा अंदाज; पहा जिल्हानिहाय अपडेट)

Mumbai Mega Block On June 8:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement