Mumbai Local Update: मुंब्रा स्थानकात लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मच्या काठाला घासली; तपासणी नंतर वाहतूक पूर्ववत सुरु, थांबवलेल्या गाड्या सुटल्या
ही गाडी 9.20 ते 9.45 पर्यंत मुंब्रा स्थानकात थांबल्याने इतर अनेक गाड्यांवर त्याचा परिणाम झाला होता.
आज संध्याकाळी उशिरा मुंब्रा स्थानकात फलाट क्र.1 वर सीएसएमटी ते टिटवाळा स्लो लोकल, प्लॅटफॉर्मच्या काठाला घासली गेली. यामुळे ट्रेन काही काळ तपासणीसाठी थांबवण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी ट्रेन तपासल्यानंतर आता वाहतूक पूर्ववत झाली आहे. ही गाडी 9.20 ते 9.45 पर्यंत मुंब्रा स्थानकात थांबल्याने इतर अनेक गाड्यांवर त्याचा परिणाम झाला होता. या कालावधी मध्ये थांबवण्यात आलेल्या K117 कल्याण स्लो लोकल, A57 अंबरनाथ स्लो लोकल, DK21 कल्याण स्लो लोकल, DL49 डोंबिवली स्लो लोकल अशा सर्व गाड्या सोडण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: मुंबई लोकलच्या लेडीज डब्ब्यात गर्दीच्या वेळी तरूणाने चक्क ओढला गांजा; व्हिडिओ वायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)