Mumbai Local Train Update: मुंबईत रविवार, 9 जून 2024 रोजी मेगा ब्लॉक; मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवरील लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, पहा वेळ आणि इतर तपशील

ब्लॉक कालावधीत सेवा निलंबित केल्या जातील किंवा वळवल्या जातील. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासून त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

Mumbai Local Train Update: मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मुंबईमध्ये रविवार, 09 जून, 2024 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर परिणाम होणार आहे. चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर 10:35 ते 15:35 या वेळेत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (लोकल) दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील.

यासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि विद्याविहार स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाउन जलद मार्गांवर, तसेच सीएसएमटी आणि वांद्रे/चुनाभट्टी दरम्यानच्या हार्बर मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सेवा निलंबित केल्या जातील किंवा वळवल्या जातील. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासून त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Matheran: पावसाळ्यात Neral-Aman Lodge दरम्यानची सेवा निलंबित, तर माथेरान-अमन लॉज शटल सेवा सुरु; रेल्वेने जारी केले वेळापत्रक)

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement