Mumbai Local Train News Update: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वे 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी ट्रेन सेवा चालवणार, जाणून घ्या सविस्तर
येत्या 27 नोव्हेंबर 2024 रोजी, या नव्याने दाखल झालेल्या एसी लोकलपैकी, पहिली लोकल सेवा चर्चगेट येथून 12:34 वाजता धावेल
Mumbai Local Train News Update: मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक दिलासादायक बाब आहे. पश्चिम रेल्वेने मंगळवारी मुंबई लोकल ट्रेनचे अपडेट्स शेअर करताना सांगितले की, 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी लोकल ट्रेन सेवा सुरू केल्या जाणार आहेत. या सेवांची सेवेची भर पडल्याने एसी लोकल सेवांची एकूण संख्या 96 वरून 109 होईल आणि शनिवार आणि रविवारी 52 वरून 65 पर्यंत वाढेल. प्रवाशांची लोकप्रियता आणि वाढती मागणी पाहता, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरी विभागात एसी लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्रवाशांच्या फायद्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी, विद्यमान नॉन एसी 12 कार सेवा बदलून आणखी 13 एसी सेवा वाढवल्या जात आहेत. या सेवा आठवड्यातील सर्व दिवस एसी सेवा म्हणून चालतील. एकूण सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही, म्हणजे 109 एसी लोकल ट्रेन सेवांसह लोकल सेवांची संख्या 1406 आहे.
27 नोव्हेंबर 2024 रोजी, या नव्याने दाखल झालेल्या एसी लोकलपैकी, पहिली लोकल सेवा चर्चगेट येथून 12:34 वाजता धावेल आणि त्यानंतर, नवीन दाखल झालेल्या सर्व एसी लोकलच्या नियमित धावा खालील वेळापत्रकानुसार धावतील. (हेही वाचा: Railway Recruitment Board Examination: रेल्वे भरती बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी CSMT आणि Nagpur दरम्यान 10 विशेष गाड्या; मध्य रेल्वेची घोषणा)
Mumbai Local Train News Update:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)