Mumbai Local Train Jumbo Block: पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो ब्लॉक; सांताक्रूझ-गोरेगाव दरम्यान 2 दिवस असणार 4 तासांचा रात्रकालीन ब्लॉक, तपशील जाणून घ्या

पश्चिम रेल्वे शनिवार आणि रविवारी रात्री सांताक्रूझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान चार तासांचा जंबो ब्लॉक घेणार आहे.

Mumbai Local Train Jumbo Block: पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो ब्लॉक; सांताक्रूझ-गोरेगाव दरम्यान 2 दिवस असणार 4 तासांचा रात्रकालीन ब्लॉक, तपशील जाणून घ्या
Western Railway (Photo Credits: File Photo)

Mumbai Local Train Jumbo Block: पश्चिम रेल्वे (Western Railway) शनिवार आणि रविवार रात्रकालीन ब्लॉक (Night Block) घेणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान हा ब्लॉक चार तासांचा असणार आहे. एका अधिकृत निवेदनात पश्चिम रेल्वेने सांगितले की, ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर 23:30 ते 03:30 या वेळेत चार तासांचा जंबो ब्लॉक(Mumbai Local Jumbo Block) घेण्यात येईल. 5व्या मार्गावर 00:30 ते 04:30 पर्यंत, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री, म्हणजे 07/08 डिसेंबर 2024 रोजी हा ब्लॉक असणार आहे. (हेही वाचा:Mumbai Local Overcrowding: एसी ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी, मुलुंड येथील व्हिडीओ व्हायरल)

 

पश्चिम रेल्वे मार्गावर नाईट ब्लॉक

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2024 11:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).