Mumbai Local Accident: दिवा-मुंब्रा वळणावर महिला लोकल मधून पडली; सिग्नल मुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video)

मध्य रेल्वेवरील डोंबिवली ते सीएसएमटी लोकलमध्ये सकाळच्या गर्दीच्या वेळी एक महिला प्रवासी दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान थेट रेल्वे रुळावर कोसळली. सिग्नलमुळे ट्रेन थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला असून, या घटनेने पुन्हा एकदा प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Mumbai Local Accident

मध्य रेल्वेवर सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली स्थानकातून सकाळी 7.56 वाजता सुटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान प्रचंड गर्दीमुळे एक महिला प्रवासी थेट खाली कोसळली. सुदैवाने सिग्नलमुळे ट्रेन त्याचवेळी थांबलेली असल्याने मोठी दुर्घटना टळली असून, महिलेला केवळ किरकोळ दुखापत झाली आहे.

दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान असलेले रेल्वेचे वळण अतिशय तीव्र आणि धोकादायक मानले जाते. यापूर्वीही याच वळणावर अतिगर्दीमुळे ट्रेनमधून खाली पडून चार ते पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 दिवा-मुंब्रा वळणावर महिला लोकल मधून पडली

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement