Mumbai Local Accident: Kharkopar स्थानकाजवळ लोकलचे 3 डब्बे घसरले; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

आज सकाळी बेलापूर कडून खारकोपरला जाणार्‍या ट्रेनचा अपघात झाला आहे.

Train Derails | Twitter

आज सकाळी खारकोपर स्थानकाजवळ एक अपघात झाला आहे.  बेलापूर कडून खारकोपरला जाणार्‍या मुंबई लोकलचे 3 डब्बे रूळावरून घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताचा मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. पण बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील वाहतूक सध्या बंद आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now