Mumbai: मुंबईला उडवून देण्याची फसवी धमकी; पोलिसांनी कॉलरचा शोध घेऊन दाखल केला गुन्हा
त्याने मुंबईला उडवून देण्याची धमकी दिली होती.
आज पुन्हा एकदा मुंबई उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, 'आम्हाला मेन कंट्रोलकडून कॉल आला की एका कॉलरने बीएमसी कंट्रोलवर कॉल केला होता. त्याने मुंबईला उडवून देण्याची धमकी दिली होती. हा कॉल आल्यानंतर मालवणी पीएसच्या विशेष पथकांनी कॉलरचा शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने फसवा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलरचे नाव नसीमुल रफीउल हसन शेख असे आहे.' (हेही वाचा: Pandavkada Waterfalls: खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर जाण्यास मनाई; कलम 144 लागू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)