Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग घटनेबाबत शिंदे सरकारची मोठी कारवाई; आयपीएस Quaiser Khalid निलंबित
कैसर खालिद यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
Mumbai Hoarding Collapse: महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने मुंबईमधील घाटकोपर होर्डिंग घटनेप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे. कैसर खालिद यांनी डीजीपी कार्यालयाच्या परवानगीशिवाय होर्डिंग्ज लावण्यास परवानगी दिली, त्यावर सरकारने कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या महासंचालकांच्या अहवालानुसार खालिद यांनी निकषांकडे दुर्लक्ष करून 120 x 140 चौरस फूट आकाराचे मोठे होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी देऊन आपल्या अधिकारांचा गैरवापर केला.
13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग पडले होते. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. महाराष्ट्र सरकारने आदेश जारी करताना सांगितले की, आयपीएस मो. कैसर खालिद यांना पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. खालिद यांच्या निलंबनानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्ट वर्तनासाठी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांना निलंबित केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. (हेही वाचा: राज्यातील शेतकरी, नागरिकांना दिलासा; 30 जूनपर्यंत मिळणार नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाई, CM Eknath Shinde यांचे निर्देश)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)