Mumbai High Tide Time Today: मुंबई मध्ये आज दुपारी 2.33 ला भरती येणार; समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन

मुंबई मध्ये दुपारी अडीजच्या सुमारास भरती येण्याचा अंदाज असून लाटा 4.31 मीटर उसळण्याचा अंदाज आहे.

Photo Credit ; X

मुंबई मध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान जोरदार पाऊस आणि सोबत भरती मुळे समुद्राला येणारं उधाण यामुळे अनर्थ घडू शकतो. त्यामुळे आज पर्यटक, मुंबईकरांना दुपारी 2.33 ला भरतीच्या वेळेत समुद्र किनार्‍यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या वेळेस 4.31 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे.  दरम्यान आज मुंबई आणि आजुबाजूच्या भागातील शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या वाहतूक सुरळीत आहे.

मुंबई मध्ये आज भरतीची वेळ काय?

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now