Mumbai Rains: मुंबईमध्ये कडाडणाऱ्या वीजा, जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात; आकाश झाले पिवळेधम्म (Watch Video)

विजेमुळे आकाश पूर्णतः पिवळे पडल्याचे दिसत आहे. प्रशासनाने घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे

Rains | File image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या नवी मुंबई परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. नेरूळ येथे गडगडाटासह, जोरदार वारे आणि रिमझिम पाऊस चालू आहे. सोबतच आकाशामध्ये विजांचा कडकडाटही सुरु आहे. सोशल मिडियावर अनेक युजर्सनी याचे व्हिडिओ आणि फोटोज शेअर केले आहेत. विजेमुळे आकाश पूर्णतः पिवळे पडल्याचे दिसत आहे.  प्रशासनाने घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement