Houses Collapsed in Chunabhatti: सततच्या पावसामध्ये चुनाभट्टी भागात कोसळली 4 घरं; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईत पावसाळ्यादरम्यान घर कोसळण्याच्या घटनांबाबत कालच आपत्ती व्यवस्थापन विभागाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झालेली आहे.

मुंबई मध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या सततच्या पावसामध्ये चुनाभट्टी भागात 4 घरं कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना 1 जुलैच्या रात्रीची आहे. काही दिवसांपूर्वीच कुर्ला परिसरात बीएमसी ने नोटीस बजावलेली इमारत कोसळली आहे. त्यामध्ये 19 जणांनी प्राण गमावले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)