Mumbai: कांजूरमार्ग येथील म्हाडा कॉम्प्लेक्सच्या इमारतीला आग, पाच जण गुदमरले

ही घटना कांजूरमार्ग येथील म्हाडा कॉम्प्लेक्सच्या इमारत क्रमांक पी-2 मध्ये ही सकाळी9.5 च्या सुमारास घटना घडली.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

म्हाडाच्या 14 मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याने किमान पाच जणांचा श्वास गुदमरला आणि त्रास झाला अशी माहिती बीएमसी आपत्ती नियंत्रण विभागाने रविवारी (26 मार्च) दिली. ही घटना कांजूरमार्ग येथील म्हाडा कॉम्प्लेक्सच्या इमारत क्रमांक पी-2 मध्ये ही सकाळी9.5 च्या सुमारास घटना घडली.

आग तळमजल्यावरील मीटर बॉक्स रूममध्ये लागली आणि वायरिंग द्वारे चौथ्या मजल्यावरील इंस्टॉलेशन्स आणि वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या वीज नलिकांमधून पसरली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी तीन अग्निशमन बंब रवाना केले. या बंबाच्या सहाय्याने साधारण 45 मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणण्यात आली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)