Mumbai Fire: मुंबई मध्ये सांताक्रुझ भागात Galaxy Hotel मध्ये आग; 3 मृत्यूमुखी 5 जखमी
आज दुपारी 1 च्या सुमारास सांताक्रुझच्या गॅलेक्सी हॉटेल मध्ये आग लागली आहे.
मुंबईच्या सांताक्रुझ भागात Galaxy Hotel मध्ये आग भडकली आहे. या आगीमध्ये 3 मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज दुपारी 1 च्या सुमारास ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)