Mumbai Fire: सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात भीषण आग; अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल (Video)
सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
Mumbai Fire: काल मुंबईमधील गोरेगाव येथे राम मंदिर स्थानकाजवळ मोठी आग लागल्याची घटना घडली होती. आता आज पुन्हा एकदा शहरातून अशीच एक आगीची घटना समोर आली आहे. सांताक्रूझ पश्चिम येथील धीरज व्यावसायिक केंद्रात ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आगीच्या घटनेमागील ठोस कारण अद्याप समोर आले नाही. या आगीच्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धुरांचे लोट दिसून येत आहेत. (हेही वाचा: Mumbai Fire: मुंबईतील गोरेगाव जवळील इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल)
Major #Fire #santacruz west Dheeraj commercial center, fire brigade trying their best pic.twitter.com/JNqH2wSaPq
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) January 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2024 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

