Mumbai Fire: मुंबईतील गोरेगाव जवळील इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल (Video)
वृत्तानुसार, बुधवारी (24 जानेवारी) संध्याकाळी मृणाल ताई गोरे फ्लायओव्हरजवळील अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समधील दुकानांना लेव्हल-3 ला आग लागली.
Mumbai Fire: मुंबईतील गोरेगाव येथील औद्योगिक संकुलाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या किमान आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गोरेगावच्या अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये राम मंदिर रेल्वे स्टेशन पुलाजवळ ही भीषण आग लागली. X (पूर्वीचे Twitter) वर या आगीचे अनेक व्हिडिओ समोर आले. व्हिडीओमध्ये परिसरातून उंच ज्वाला आणि दाट काळ्या धुराचे ढग निघत असल्याचे दिसून येत आहे. वृत्तानुसार, बुधवारी (24 जानेवारी) संध्याकाळी मृणाल ताई गोरे फ्लायओव्हरजवळील अस्मी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समधील दुकानांना लेव्हल-3 ला आग लागली. या आगीत डिझेलचे गोदाम आणि भंगार साहित्याची दुकाने जळून खाक झाली. या घटनेनंतर मृणाल ताई गोरे उड्डाणपूल वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा: Bulldozer Action in Miraroad: मीरा रोड येथील उपद्रवींवर मोठी कारवाई, श्री राम शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांच्या बेकायदा बांधकामांवर सरकारचा बुलडोझर)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)