Sanjay Raut यांचं NCB छापेमारी प्रकरणानंतर सूचक ट्वीट; 'Wait and Watch'
आर्यन खान च्या प्रकरणामध्ये 25 कोटी रुपयांची डील झाली असून त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने केल्याने आता या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत.
संजय राऊत यांनी आज (24 ऑक्टोबर) मीडीयाशी बोलताना नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची स्टोरी मी सांगेन, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तर 'वेट अॅन्ड वॉच' हे ट्वीट देखील आता संजय राऊत कोणती पोलखोल करणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे. तर Sam D'Souza हा मुंबई सह देशातला मोठा Money-Laundering Player असून देशभक्तीच्या नावाखाली काही जण पैसे लुबाडत असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)