Mumbai Crime: मॉडेलच्या 'वेब सीरिज ऑडिशन'चा इंटिमेट व्हिडिओ Porn Site वर अपलोड केला; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी वसई-विरार येथे आपल्या कुटुंबासह राहते. तिने हिंदी सिनेमा किंवा मालिकांमध्ये कामाच्या शोधात अनेक प्रॉडक्शन हाऊसला भेट दिली होती.
मुंबईजवळ राहणाऱ्या एका 18 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीने एका प्रोडक्शन हाऊसमधील चार लोकांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली आहे. तिचा आरोप आहे की, त्यांनी 'वेब सीरिज ऑडिशन'साठी शूट केलेला एक व्हिडिओ एका पॉर्न साइटवर अपलोड केला. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती तिला एका मैत्रिणीने दिली, त्यानंतर तिने याबाबत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीची नोंद मंगळवारी अर्नाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि हे प्रकरण मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 3 कडे वर्ग करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी वसई-विरार येथे आपल्या कुटुंबासह राहते. तिने हिंदी सिनेमा किंवा मालिकांमध्ये कामाच्या शोधात अनेक प्रॉडक्शन हाऊसला भेट दिली होती. काही आठवड्यांपूर्वी, तिला एका प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला व त्यांनी तिला वेब सीरिजसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. त्यानंतर ऑडिशनचा भाग म्हणून तिच्याकडून एक इंटिमेट सीन शूट करून घेतला. काही दिवसांनंतर तिचा एक अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर आढळून आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (हेही वाचा: Teacher Having Sex on School Campus: बीडमध्ये शाळेच्या कॅम्पसमध्येच पुरुष शिक्षकाचे तीन महिला शिक्षकांसोबत शारीरिक संबंध; Porn Site वर पोस्ट केले व्हिडिओ; गुन्हा दाखल)
Aspiring actress near Mumbai files police complaint after ‘web series audition’ tape lands up on porn site https://t.co/MhW2LcgARJ #Mumbai #Maharashtra
— Express Mumbai (@ie_mumbai) December 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 12:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

