Mumbai Coastal Road Project: गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क मार्गावरील दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण; कार्यक्रमाला CM Eknath Shinde आणि DCM Devendra Fadnavis यांची उपस्थिती (Watch)

मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतू यादरम्यान बनलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे.

CM Eknath Shinde and Devendra Fadnavis

मुंबई शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणाऱ्या कोस्टल रोडवरील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या मार्गावरील दुसऱ्या बोगद्याचे खनन काम आज पूर्ण झाले. भारतातील सर्वात मोठे टीबीएम मशीन असलेल्या ‘मावळा’ या मशीनच्या सहाय्याने ही मोहीम फत्ते करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कोस्टल रोडचे खनन आता 100 टक्के पूर्ण झाले असून, येत्या वर्षाखेरीस हा प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतू यादरम्यान बनलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. हा मार्ग शिवडी-न्हावाशेवा कोस्टल रोडला देखील जोडण्यात येणार असून पुढे तो भाईंदर विरार पर्यंत वाढवून पश्चिम उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यासमयी बोलताना सीएम शिंदे यांनी सांगितले. (हेही वाचा: राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार वार्षिक 6,000 रुपये; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now