Mumbai: चर्चगेट स्थानकाचे नाव बदलून होणार Chintamanrao Deshmukh Station; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठराव मंजूर

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर काल (मंगळवार, 21 फेब्रुवारी) पहिल्यांदाच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली.

चर्चगेट स्थानक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चगेट स्थानकाचे नामकरण चिंतामणराव देशमुख स्टेशन असे करण्याचा ठराव मंजूर केला. चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे 1943 मध्ये आरबीआयचे पहिले गव्हर्नर बनले होते. 1950-56 दरम्यान ते भारताचे अर्थमंत्रीही झाले. त्यांच्या नावावरून चर्चगेट स्थानकाला नाव देण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर काल (मंगळवार, 21 फेब्रुवारी) पहिल्यांदाच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. मुंबईतील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकनाथ शिंदे होते. बैठक संपल्यानंतर कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी त्यातील प्रस्ताव आणि मागण्यांशी संबंधित माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी त्यांनी सांगितलेक की मुंबईतील चर्चगेट स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement