मुंवई व गोवा पोलिसांकडून मोस्ट वॉण्टेड गुन्हेगाराला अटक; 40 हून अधिक गुन्हे आहेत दाखल

आरोपीचा महाराष्ट्र राज्यात नोंद झालेल्या 40 हून अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे

Arrested

गोवा पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेसह रविवारी, 40 हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या मोस्ट वॉण्टेड आणि दहशतवादी गुन्हेगाराला पणजी येथे अटक केली. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत उर्फ ​​विकी असे आरोपीचे नाव आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी सांगितले की, 'काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत, पणजी टाऊन पोलीस स्टेशन आणि नवी मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्या नियोजनाद्वारे मुंबई, महाराष्ट्रातील मोस्ट वाँटेड आणि भयानक गुन्हेगार विक्रांत उर्फ ​​विक्की दत्तात्रेय देशमुख याला पकडले.'

आरोपीचा महाराष्ट्र राज्यात नोंद झालेल्या 40 हून अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे आणि सध्या तो मुंबईतील नेरुळ पोलीस स्टेशनला खून आणि मोक्का गुन्ह्यांमध्ये हवा आहे. आरोपीविरुद्ध पणजी पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट 1959 च्या कलम 3 आर/डब्ल्यू 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement