Mumbai Accident: भरधाव कारच्या धडकेत 75 वर्षीय नागरिक ठार, एक जखमी; चालकाचा घटनास्थळावरुन पोबारा
मुंबई येथील मुलंड परिसरात काल मध्यरात्री एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव कारणे धडक दिली. यात सदर नागरिकाचा मृत्यू झाला. तुकाराम सावंत असे या वृद्धाचे नाव आहे. या घटनेत आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध IPC कलम 279,304(A), 337,338 आणि मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा, Ratnagiri Accident: दापोलीत ट्रक- वडाप गाडीचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी)
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)