Mumbai: रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामात अनियमितता झाल्याचा Aaditya Thackeray यांचा आरोप; बीएमसी आयुक्त Iqbal Singh Chahal यांना लिहिले पत्र

मुंबईतील सुमारे 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव कोणी दिला? असा प्रश्न माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी आज बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना एक पत्र लिहून, मुंबईमधील रस्त्यांच्या मेगा-टेंडर्सच्या कथित अनियमिततेशी संबंधित काही प्रश्न विचारले. आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार मुंबईतील रस्ते बांधणीच्या निविदेत घोटाळा झाला आहे. 400 किमीचा रस्ता तयार करण्यासाठी 6000 कोटींहून अधिक किमतीची निविदा काढण्यात आली आहे.

मुंबईतील सुमारे 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव कोणी दिला? असा प्रश्न माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. आज पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे यांनी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी काही मुदत आहे का? असा सवालही केला. ते म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी, महापौर किंवा स्थायी समिती नसताना प्रशासनानेच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव मांडणे आणि मंजूर करणे कितपत योग्य आहे?. आज याबाबत त्यांनी चहल यांना एक पत्र लिहिले आहे.