Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झाला नाही; सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या माहितीबाबत राज्य सरकारचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळया स्तरावरुन कार्यालयाकडे विचारणा होत आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. अदिती तटकरे यांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळया स्तरावरुन कार्यालयाकडे विचारणा होत आहे. याबाबत कार्यालयाने नमूद केले की, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडुन आपणास कळविण्यात येईल. (हेही वाचा: Ladki Bahin Yojana Scrutiny: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची होणार छाननी? महायुती सरकारचा संभाव्य निर्णय?)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झाला नाही-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)