Mukesh Ambani Visited Lalbaugcha Raja: मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत आणि सुना राधिका मर्चंट व श्लोका मेहतासोबत घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, पहा व्हिडिओ (Watch)

काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनने 20 किलो सोन्याच्या मुकुट लालबागच्या राजाला भेट दिला आहे. या मुकुटाची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mukesh Ambani, Anant Ambani and Family Members at Lalbaugcha Raja (Photo Credits: ANI)

Mukesh Ambani Visited Lalbaugcha Raja: देशभरात सर्वत्र गणपती उत्सवाची धूम सुरु आहे. गणेशोत्सवाचा आज सहावा दिवस. आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानी आणि दोन्ही सुना राधिका मर्चंट व श्लोका मेहता यांच्यासोबत लालबागचा राजा मंडळाल भेट दिली. यावेळी संपूर्ण कुटुंबाने बाप्पांची पूजा करत त्यांचे आशीर्वाद घेतले. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. अनंत अंबानीने लालबागच्या राजाला दुसऱ्यांदा भेट दिली. याआधी तो गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी संध्याकाळीही बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आला होता.

काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनने 20 किलो सोन्याच्या मुकुट लालबागच्या राजाला भेट दिला आहे. या मुकुटाची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा लालबागच्या राजाला मखमली पोशाख आणि खऱ्या दागिन्यांमध्ये सजवण्यात आले आहे. यामध्ये सोन्याचा मुकुट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अनंत अंबानीचे लालबागच्या राजाच्या मंडळातील योगदान लक्षात घेऊन त्यांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मानद सदस्यत्व देण्यात आले आहे. (हेही वाचा: Lalbaugcha Raja New Viral Video: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान सेलिब्रेटी आणि सामान्य भक्तांना वेगवेगळी वागणूक; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फुटले नव्या वादाला तोंड)

मुकेश अंबानी यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन-

 

View this post on Instagram

 

A post shared by Asian News International (@ani_trending)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now