Moreshwar Temurde Passes Away: विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, NCP नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन; मरणोत्तर देहदानाचा निर्णय
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. दरम्यान मोरेश्वर यांचे पार्थिव शरीर रीतीरिवाजानुसार न जाळता तो वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान स्वरूपात दिला जाणार आहे. दरम्यान वरोरा विधानसभा क्षेत्रातून ते आमदार झाले होते. आज त्यांच्या निधनावर शरद पवारांसह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे.
शरद पवार
राजकारणात अत्यंत सक्रीय असणारे सामाजिक व राजकीय प्रश्नांवर पोटतिडकीने काम करणारे टेमुर्डे यांच्या निधनाने एक संवेदनशील व्यक्तिमत्व हरपले. टेमुर्डे कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो व मोरेश्वर टेमुर्डे यांना भावपूर्व श्रद्धांजली.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 22, 2023
सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र विधान सभेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय अॅड मोरेश्वर टेमुर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! pic.twitter.com/IkBMU4LwvL
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) January 22, 2023
सुप्रिया सुळे
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. त्यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या निधनामुळे टेमुर्डे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/qx28cRjwDM
— Supriya Sule (@supriya_sule) January 22, 2023
किशोर जोरगेवार
महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर राव टेमुर्डे यांचे आज दुःखद निधन झाले, त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली@NCP_Parliament pic.twitter.com/pqwgZo9pOJ
— Kishor Jorgewar Official (@jorgewar_speaks) January 22, 2023
अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,वरोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲड.मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनानं एकनिष्ठ व प्रामाणिक व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत.पक्षवाढीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे.टेमुर्डे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/zIYmE1TMtl
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2023 01:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

