IPL Auction 2025 Live

Maharashtra Weather Forecast: मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण; 24 जूनला मुंबईत दाखल होण्याचा IMD Mumbai चा अंदाज

मागील आठवड्यात मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे पण मध्यंतरी बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्याच्या पुढील वाटचालीवर परिणाम झाला होता पण आता हवामान अनुकूल असल्याची माहिती समोर आली आहे.

Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

निम्मा जून सरला तरीही महाराष्ट्रात यंदा पावसाची चिन्हं नाहीत. घामांच्या झळ्यांनी वैतागलेल्या मुंबईकरांसाठी हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे. येत्या 2-3 दिवसांत मुंबई मध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आयएमडी मुंबई ने वर्तवली आहे. सध्या रायगड, ठाणे, पालघर, मुंबई कडे मान्सून सरकण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं वेधशाळेने म्हटलं आहे. Weather Forecast & Monsoon 2023 Updates: मान्सून मुंबईत बरसणार, पण कधी? हवामान विभागाने तारीखही सांगितली; घ्या जाणून .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)