Mumbai Monsoon Forecast: मुंबईमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे भाकीत वर्विण्यात आले आहे. अर्थात मान्सून तोंडावर आला असला तरी अजूनही दाखल झालेले नाही. त्यामुले हे भाकीत किती सत्यात उतरते हे पाहण्यासाठी काही काळ वाटच पाहावी लागेल.

Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उकाड्याने कासावीस झालेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. सोशल मीडिया वापरकर्ता मुंबई नॉकास्ट यांनी X वर भारताच्या नकाशाचे चित्र शेअर केले आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर ढगांचा समुद्र असल्याचे सांगितले. वापरकर्त्याने जून आणि जुलै महिन्यात मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला. "बघूया कोणते नवे विक्रम प्रस्थापित होतील. #MumbaiRains," असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif