Maharashtra Monsoon 2023: मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; हवामान खात्याने दिली माहिती

कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

उशीराने आलेल्या मान्सूनने एका दिवसांतच संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. हवामान खात्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून महाराष्ट्रात उशीराने दाखल झाला होता. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगडसह कोकणाला हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement